Akurdi, Pimpri-Chinchwad, Pune
First Outlet
या आणि चवीचा आनंद घ्या!स्पेशल पावभाजी आणि मिसळ हाऊस☎ 9823143878ABOUT SWADISHT
एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या Mechanical Engineer पासून Food Entrepreneur पर्यंतचा प्रवास...
FOUNDER'S STORY
Ranjeet Mohan Admane हे शेतकरी कुटुंबातून आलेले Mechanical Engineer आहेत. Degree पूर्ण केल्यानंतर पारंपरिक नोकरी करण्यापेक्षा Food Industry मध्ये स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
लहानपणापासूनच मातीशी, शेतीशी आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले असल्यामुळे अस्सल पारंपरिक चवीची आणि सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीची एक वेगळीच ओढ होती.
“सोलापूरची अस्सल चव सर्वत्र पोहोचवायची!”
याच ध्येयातून 2017 मध्ये Akurdi, Pimpri-Chinchwad, Pune येथे Swadisht ची पहिली outlet सुरू झाली. Swadisht मध्ये सोलापुरी काळा मसाला वापरून तयार केलेली मिसळ आणि अस्सल सोलापुरी पद्धतीची Pavbhaji ग्राहकांच्या पसंतीस उतरली.

THE SWADISHT DIFFERENCE
Swadisht च्या खास चवीमागे केवळ ingredients नाहीत, तर पारंपरिक पद्धत आणि चवीशी असलेली बांधिलकी आहे. मिसळ आणि इतर पदार्थांसाठी लागणारे अनेक मसाले स्वतःच्या पद्धतीने तयार केले जातात आणि पारंपरिक पद्धतीने “डंका”वर बारीक केले जातात.
या प्रक्रियेमुळे मसाल्याचा खास पोत, सुगंध आणि अस्सल चव टिकून राहते. म्हणूनच Swadisht ची मिसळ गावाकडच्या चवीची आणि पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बनते.

SWADISHT OUTLET JOURNEY
First Outlet
आज Swadisht म्हणजे केवळ एक restaurant नाही. Swadisht हा सोलापूरच्या अस्सल चवीला आधुनिक restaurant concept सोबत जोडणारा food brand आहे.